'महालक्ष्मीची कहाणी Mahalaxmichi Kahani'
![]() |
| Maha-laxmichi-Kahani |
एक आपलं आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता.. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती अन् दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नाव चिमादेवराणी होतं. या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदनवनेश्वर होतं. तो झणी उडे, झणी बुडे, क्षणी स्वर्गात जाई, क्षणी पाताळात जाई. असा राजाच्या पाठीस लागला होता.. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले व नंदनवनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडं तिकडं शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता.
ज्येष्ठागौरीची कहाणी Jyeshtha Gouri Kahani
तो आपल्या आईला म्हणाला, आई, आई, मला भाकर दे. मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली तू गरियाचा पोर आहेस तर चार पावलं पुढं जा. झाडाआड ही वाळलेली भाकरी खा. म्हणजे लोक ना हसणार नाहीत. पोरानं वरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकर दिली. म्हातारीचं पोर भाकरी घेऊन निपालं. सगळयांच्या पुढं गेलं. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदनवनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं रात्र फार झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्यरात्री काय झालं ? देवकन्या, नागकन्या तिथं आल्या, महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. मुलानं विचारलं, बाई, बाई, ह्यानं काय होतं? त्यांनी सांगितलं की, पटल झडलं सापडतं, मनीं चितिलेलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोही वसा वसू लागला.
पूजा केली, घागरी फुंकल्या, पहाटेस उत्तरपूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरात जाती जागती झाली तसा नागकन्यांनी वर मागितला, तसा ह्यानंही मागितला. तेव्हा देवीनं आशीर्वाद दिला की राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांघशील, नवलवाट नाव ठेवील. तो बेरी डावा पाय मस्तकी घेऊन राजाच्या अंगणात मरून पडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटेस उठली. परसात आली तो राजाचा बेरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तभी तिनं ही गोष्ट राजास जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळयांच्या मागं होता. त्यानं त्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं.
'महालक्ष्मीची कहाणी Mahalaxmichi Kahani'
राजानं त्याला बोलावू धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. स्थानं राजाला पुसलं, राजा, राजा, मी आळ नाही घातला, अन्याय नाही केला, तर मला इथं का बोलावलं ? राजा म्हणाला, भिऊ नकोस, घाबरू नकोस,माझा वैरी नंदनवनेश्वर कोणी मारला ? सगळे लोक तुझंच नाव सांगतात. याचं काय ते कारण सांग. पोरगा म्हणाला, राजा राजा, मी त्याला मारला नाही. पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती कोणती ? तिला तू कुठं भेटलास ? पोर म्हणाला, मी सगळयांच्या पाठीमागून निघालो. थोडासा पुढं गेलो, शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. तो येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. मध्यरात्री नागकन्या, देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्यांची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली, घागरी फुंकल्या, पहाटे महालक्ष्मी कोल्हापुरास जाती जागती झाली.
सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला ? मला आशीर्वाद असा मिळाला की, शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधशील, नवलवाट नाव ठेवशील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. तू घेऊन घरी आलो तो आपलं बोलावणं आलं. राजानं त्याची हकीकत ऐकली, आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं. अर्ध भांडार दिलं. माडीशी माडी बांधून दिली. नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं राहू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीनं नवलवाटाला बोलावू धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखविला. तिला सांगितलं, आश्विन मास येईल, अष्टमी येईल, त्या दिवशी सुतांचा तातू तेलहळद लावून करावा. सोळा दूर्वा, सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी.
सोळा अर्ध्य द्यावे, धूपदीप दाखवावा. नंतर नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणं दर आश्विन मासी करावं. असा वसा तिनं समजून घेतला व आपण ते व्रत पाळू लागली. पुढं एके दिवशी काय झालं ? राजा राणींच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय म्हणून विचारलं. राणीनं तातूची सर्व हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हारे बहू, दोरे बहू, काकणे बहू कळावे बहू, तेव्हा व्रताचं सूत तू सोडून टाक. मला ह्याची गरज नाही. पुढे रात्र झाली, राजाराणी दोघे निजली. सकाळी दासी-बटकी महाल झाडू लागल्या.
'कहाणी पाचा देवांची Kahani Pacha Devachi'
केरात त्यांना तातू सापडला. दासींनी तो नवलवाटा दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला ? त्याला नावडती भेटली. तिनं तो तातू मागितला. तेव्हा हा म्हणाला. तू उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिनं सांगितलं, उतणार नाही; मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली केला व वसा सांगितला. पुढं आश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला ? देवी महा- लक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं, पाटमाधवराणीच्या महाली गेली. • महालक्ष्मीची तिला आठवण आहे की नाही हे पाहू लागली. तो घरात कुठं काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाटमाधवराणीला म्हणू लागली, अगं, अगं, पाटमाधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काही नाही.
तेव्हा राणीला पुन्हा म्हणाली, अगं, अगं, पाट- माधवराणी, पुत्रांची माय, म्हातारीला पाणी देशील तर ते तुझ्या राज्याला पुरे होईल. राणीने उत्तर दिलं की, म्हातारीला तांब्याभर पाणी दिले तर माझ्या राज्याला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाटमाधवराणीला हाक मारली. अगं, अगं, पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला दहीभाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणी म्हणाली, म्हातारीला दहीभाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला ती पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला, तो काय 'दिला ? सवतीच्या महाली डाराडूर करीत असशील. अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं असं होऊन तू पडशील ! इतकं राणीनं ऐकलं व खदखदा हसली.
पुढं म्हातारी निघून गेली. ती चिमादेवराणीच्या महाली गेली. इकडं तिकडं पाहू लागली. तो तिला जिकडं तिकडं गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं व दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला दिसला. तिनं चिमादेव राणीला विचारलं, अगं, अगं, चिमादेवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे ? तिनं
उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच आहे. राणी म्हणाली, तुला कशानं ओळखावी ? कशानं जाणावी? तो ती सकाळी कुवारीण झाली मध्यान्ही तरुणी झाली. संध्याकाळी पोक्त बायको झाली, अशा तिन्ही कळा तिनं तिला पालटून दाखविल्या नंतर राणीनं तिला घरात बोलाविलं. न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिलं.
चौरंग बसायला दिला. राणीनं नवलवाटांनी पूजा केली. संध्याकाळ झाली, देवीसमोर दोघीजणी घागरी फुंक लागल्या. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धूपांचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली व विचारलं, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो, तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. पाहिलेली हकी- कत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडं आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला व मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळ लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरास जाती जागती झाली. तशी राणी म्हणाली, माय, मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ ? राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणीत डाराडूर करील.
अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं अशी ती होऊन पडेल. तशी चिमादेवराणीने तिची प्रार्थना केली की, इतका कडक शाप देऊ नका. तसं देवीन सांगितलं की, राजा तिला बारा वर्षं वनात तरी धाडील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजानं तिला रथात घातल व राजवाड्या- समोर घेऊन आला. पाटमाधवराणीला निरोप धाडला की, राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू गामोरी ये तशी ती फाटक- तुटकं लुगडं नेसली. घाणेरडी चोळी अंगात घातली, केस मोकळे सोडले. कपाळी मळवट भरला, जळतं खापर डोईवर घेतलं आणि ओरडत, किंचाळत पुढं आली. तो राजानं विचारलं, ओरडत- किंचाळत कोण येत आहे ? मूत आहे की खेत आहे ? शिपायांनी सांगितलं, भूत नाही की खेत नाही.
तुमचीच राणी तुम्हांला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका. असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजाराणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाट- माधवराणीला रानात नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मळमळ रडू लागली. तस शिपायांनी सांगितले, बाई, बाई, रडू नको, आम्ही तुमच्या हातचं खाल्लं प्यालेलं आहे. आमच्यान तुला काही मारवत नाही, म्हणून सोडून दतो; पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको. राणीला तिथं सोडून दिलं व आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फिरता फिरता नगरात गेली. पहिल्यानं कुंभाराच्या आळीत गली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली की, नवं माणूस कोण आलं आहे ? तो ही सापडली. त्यांनी हिला हकन-पिट्न लावली.
पुढं ती कासा- राच्या गेली. तिथं नव्या राणीला चुडा करीत होते. पण एकही चुडा उतरेना. तेव्हा चौकशी केली की, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हा ही सापडली. लोकांनी हिला हाकून पिटून लावली. तेथून निघाली तो सोनाराच्या आळीला गेली. नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते. तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली की, नवं माणूस कोण आहे ? तेव्हा ही सापडली. त्यांनी हिला हाकून पिटून लावली. तेथून निघाली तो साळ्याच्या आळीस गेली. तिथं पाहातात तो, नव्या राणीला नवी साडी विणीत होते, पण एकही साडी चांगला उतरेना. मग त्यांनी चौकशी केली की नवं माणूस कोण आलं ? इकडे तिकडे पाहू लागले, तो ही सापडली. मग हिला तेथून हाकन पिटून लावली. पुढं ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषींची गुंफा दृष्टीस पडली, तिथं गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तेथेच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाडसारवण करी. पूजेचं मांडून ठेवी. अशी तिनं बारा वर्ष सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. म्हणाले, इथं झाडसारवणकोण करिते ? स्थानं समोर यावं.
तशी ती ऋषींच्या समोर आली. नमस्कार केला. ऋषीनं झाडसारवण करण्याचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासूनची हकीकत सांगितली. ऋषीना पोथ्यापुस्तकं वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिजकडून महालक्ष्मीची पूजा कर- विली. रात्री घागरी फुंकविल्या. पहाटे महालक्ष्मीमाय कोल्हा- पुरात जाती जागती झाली, तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीनं उःशाप दिला. ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव. फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळयाचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊ लागेल. राजा उद्या येथे येईल, तहानेला असेल त्याचे शिपाई इथं पाण्याचा शोध करतील.
ते ही सगळी तयारी पाहातील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा तिथं येईल. त्याप्रमाणं दुसऱ्या दिवशी राजा तिथं आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले, पोटभर फराळ केला, पाणी प्याला, कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला. पुढे राजानं शिपायांना विचारलं, जिथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्याला सगळयाला पाटमाधवराणीच्या हातचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लेलं प्यालेलं, तेव्हा आमच्यानं काही तिला मारवलं नाही. तिला आम्ही सोडून दिलं.
राजा म्हणाला, असं असेल तर तुम्ही तिचा आसपास शोध करा. 'शिपाई निघाले. ऋषींच्या गुंफा पाहिल्या, तिथं ही सापडली. राजाला शिपायांनी गुंफत नेलं. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा शोध केला व राणीला नमस्कार करण्यास सांगितलं. नंतर तिला राजाच्या हवाली केलं. तसं उभयतांनी ऋषींना नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढं राजानं तिला रथात घातलं. आपल्या नगरी घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठविला, राजा पाटमाधवराणीला घेऊन येत आहे. त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाली, माखली, पीतांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले. नगरच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत- गाजत राणीस सामोरी गेली.
राजानं विचारलं, वाजतगाजत कोण येत आहे ? नागकन्या की देवकन्या ? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाहीत, देवकन्या नाहीत, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधवराणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजानं चिमादेवराणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजतगाजत नगरात आला व सुखानं रामराज्य करू लागला. जशी पाटमाधवराणीवर महालक्ष्मी माय कोपली होती तशी तुम्हां आम्हांवर ती न कोपो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्णं.
